#MCNNEWSJALGAONJAMOD....................................जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार ही सर्वात मोठी कृषी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाते.
कृषी बाजार समितीच्या आवारामध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करण्यात आले आहे.
प्रशासकीय अध्यक्ष म्हणून रमेश पाटील व प्रशासकीय संचालक संदीप उगले यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करण्यात आले होते.
दहा दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोविंड चा वाढता प्रादुर्भाव पाहता छोट्या खानी विविध कार्यक्रमाचे आयोजन नियमित केल्या जात आहे. यामधे भजन, किर्तन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या गणपती उत्सव करिता कोणत्याच प्रकारची वर्गणी गावातून करण्यात आली नाही.
दररोज च्या कार्यक्रमाचे आणि आरतीचे नियोजन बाजार समितीचे सचिव प्रमोद पुदाके आणि मच्छिंद्र मुळे, महादेव बाठे,श्रीराम उंबरकर,सुपडा काटोले व व्यापारी संघटनेने मधून संजय चांदणे, सुरेश कलंत्री, निलेश कलंत्री, योगेश केला, गजानन भेलके, रितेश पैठणकर, संतोष राठी ,विजय दाताळकर,घनशाम राठी ,उमाकांत राठी,हरिभाऊ माटे,गजानन पाटील हे आणि इतर मंडळी सहकार्य करीत आहे
प्रतिनिधी
संजय दांडगे
जळगाव जामोद.. / @mcnnewsjalgaonjamod